करवा चौथ आणि बुद्धीचा चोथा



आज करवा चौथ आहे आणि त्यानिमित्तानं अनेक बायका आपल्या नव-याच्या आयुष्यासाठी व्रत करणार आहेत. तर कुमारीका आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करणार आहेत. त्यावरून सध्या सोशल मीडियावर मोठ्या उलट सुलट प्रतिक्रिया वाचायला मिळताहेत. त्यामुळं इथं काही निरिक्षणं मांडतोय.
-    करवा चौथ हे उत्तर हिंदूस्थानमधलं लोकप्रिय व्रत आहे.
-    हिंदी चित्रपटांनी हे व्रत आख्ख्या देशात पसरवलं.
-    मागील काही वर्षांपासून स्त्रीवाद्यांनी या व्रताविरूद्ध आवाज उठवायला सुरूवात केली.
-    गेल्या काही वर्षांतच व्यावसायिक कंपन्यांनीही या व्रताचा आपली उत्पादनं खपवण्यासाठी उपयोग सुरू केला आणि त्यासाठी नवरे मंडळींचं इमोशनल ब्लॅकमेंलिंग सुरू केलं.
-    आता एक गट स्त्रीवाद्यांवर टीका करतोय कारण त्या या व्रताच्या विरूद्ध आहेत.
-    त्यापुढे जाऊन काही हिंदूत्त्ववादी या व्रताची तुलना रमझानमधीन रोझे (उपवास) यांच्याशी करताहेत आणि स्त्रीवादी आणि मुस्लिम लोकांना आव्हान देत आहेत.
-    कट्टर हिंदू त्याच्यापुढे जाऊन हलालाचा विषय काढून मुस्लिमांना टार्गेट करताहेत.
-    तर टवाळखोर, स्त्रीवादी, करवा चौथ करणा-या बायका, हिंदू, मुस्लिम या सर्वांचीच टिंगल टवाळी करत आहेत.
ही सारी तटस्थ निरिक्षणं आहेत. याची उदाहरणं ट्वीटरवर शेकड्यानं बघायला मिळतील. पण या सर्वांतून एक गोष्ट अशी जाणवते की लोक आता एकमेकांच्या चालीरितींविषयी आणि त्यांतल्या ब-यावाईट गोष्टींविषयी मोठ्या प्रमाणात बोलत आहेत. त्यानिमित्तानं एकमेकांना समजून घेत आहेत. कारण जेव्हा एक गट दुस-यावर टीका करतो तेव्हा तो गट आपली बाजू कशी चूकीची नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बाकी महिलांनी करवा चौथ व्रत करावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या नव-याचा प्रश्न आहे. कोणी कोणासाठी उपवास ठेवायचा, कोणी कोणाला भेटवस्तू द्यायची हाही त्यांचाच प्रश्न आहे. या व्रताच्या निमित्तानं पूर्वी पुजारी आपले खिसे भरून घ्यायचे त्यांची जागा आता कंपन्यांनी घेतली आहे.
आपल्या देशांत हिंदूंमध्ये किमान १६२२ वेगवेगळी व्रतं केली जातात. त्याचा जास्तीत जास्त भार अर्थांत स्त्रियांवरच पडतो. यातली बहुतेक व्रतं बायकांनी त्यांच्या नव-यांच्या सुखासाठी करायची आहेत. नव-यांनी बायकांच्या सुखासाठी करायची व्रतं जवळपास नाहीतच. इतकं असूनही जर आजही आजच्या काळातील स्त्रियांना ही बिनडोक व्रतं करावशी वाटत असतील तर त्याला आता कुठवर विरोध करणार हा प्रश्नच आहे.
या करवा चौथ व्रताची एक कथा आहे. प्रत्येक व्रताची अशी एक कथा असते. या कथा मोठ्या इंटरेस्टींग असतात. त्या इतक्या रद्दड, बिनडोक, मूर्खपणाच्या असतात की त्या कथांवर ज्या बायका, पुरुष विश्वास ठेवतात त्यांच्या डोक्यांत मेंदू नावाचा पदार्थ असेल यावर विश्वास बसणं कठीण होतं. तर या व्रताची ही कथा अशी आहे. कंसात आम्ही काही मतं नोंदवली आहेत. जिज्ञासूंनी तीही नक्की वाचावित.

एक नगर में (धार्मिक कथांमध्ये हा मोघमपणा नेहमीच आढळतो. कारण मूळातच सारं खोटं असतं.) एक साहूकार अपने सात लड़के और एक लड़की के साथ रहता था। साहूकार की महिलाओं ने कार्तिक महीने की कृष्ण पक्ष की चतुर्थी पर अपने पति के लिए करवा चौथ का व्रत रखा। भाभियों को देखकर साहूकार की बेटी ने भी अपने पति के लिए व्रत रख लिया। (ही बहिण तिच्या सासरी का गेली नाही ते कळत नाही. कारण आपल्या पतीच्या हातून जेवण करूनच व्रत उपवास तोडायचा असतो.) रात्रि भोज में जब सभी भाई खाने के लिए बैठे तो उन्होंने अपनी बहन को भी आवाज लगाई। व्रत के कारण भूख-प्यास से व्याकुल उनकी बहन ने खाना खाने से मना कर दिया और कहा कि आज मेरा व्रत है मैं चांद देखकर ही खाना खाऊंगी। भूख-प्यास से व्याकुल बहन की हालत भाइयों से देखी न गई तो उन्होंने घर के बाहर जाकर आग जलाते हुए बहन से कहा कि देखो बहन चांद निकल आया है तुम पूजा संपन्न करके खाना खा लो। (जळती आग आणि चंद्र यांतला फरक जिला समजत नाही त्या बाईबद्दल काय बोलायचं?) दूसरी तरफ उसकी भाभियां इस पूरे कृत्य के बारे में जानती थीं। उन्होंने अपनी ननद को समझाने की कोशिश की लेकिन वह नहीं मानी और पूजा-पाठ करके खाना खा लिया। उसके व्रत टूटने से नाराज भगवान गणेश नाराज हो गए। (इथं गणपती कसे काय आले हे समजत नाही.) इसके बाद ही उसका पति बीमार हो गया और उसमें घर की सारी जमा पूंजी खर्च हो गई। साहूकार की बेटी को अंदेशा हुआ कि कहीं उसके गलत व्रत के कारण तो ऐसा नहीं हुआ। इसलिए उसने अपनी गलती का पश्चाताप करते हुए दुबारा व्रत रखा। फिर विधि-विधान से व्रत का पूजन कर भगवान गणेश की पूजा की। साहूकार की बेटी की श्रद्धा को देखते हुए भगवान गणेश ने उसके पति जीवन दान दे दिया और सारी जमा पूंजी भी वापस कर दी।(व्रत ठेवणारी बाई भूख सहन न झाल्यानं जेवली असेल तर तो इतका मोठा दोष ठरतो का? गणपती हा देव आहे आणि बुद्धीची देवता आहे तर त्याला इतकीही समज नाही का? देव असून त्याला आपल्या भक्ताला समजून घेता येत नाही का? तो इतका खूनशी कसा असू शकतो?)

आता या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची हेही ज्यानं त्यानं ठरवायचं. गळ्यातल्या जोखडाला जर कोणी दागिणा समजत असेल तर त्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही. करवा चौथच्या निमित्तानं हे इतकंच.

Comments